Ad will apear here
Next
जगभरातील एक कोटी मराठी भाषकांचा आज कोविड-१९ महाजागर
पुणे : कोविड-१९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील ४२ देशांतून, अमेरिकेतील २१ राज्यांतून आणि महाराष्ट्रासह भारतातील १२ राज्यांतून एकाच वेळी अनेक मराठी भाषक एकत्र येत आहेत. २५ मे २०२० रोजी ते सोशल मीडियावर कोविड-१९च्या संबंधाने महाजागर करणार आहेत. विश्व मराठी परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे नेतृत्व ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका’च्या अध्यक्ष विद्या जोशी करणार आहेत. ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०२१ शार्लेट अमेरिका’चे मुख्य संयोजक आणि ‘गर्जा मराठी’चे संस्थापक सदस्य संदीप पाध्ये, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, तसेच जगभरातील अनेक देशांतील आणि भारतातील अनेक राज्यातील महाराष्ट्र मंडळांचे आजी-माजी पदाधिकारी या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत. 

विद्या जोशी, अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, नॉर्थ अमेरिकाकोविड-१९च्या अनुषंगाने मानसिक आणि भावनिक आरोग्याबरोबर शैक्षणिक जागृती, असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. २५ मे रोजी हा जागृती संदेश ४२ देश, अमेरिकेतील विविध राज्ये. भारतातील विविध राज्ये आणि महाराष्ट्रातील विविध शहरांमधून एकाच दिवशी लाखो लोक शेअर करतील आणि त्यापुढील ७२ तासांत तो जगभर मोठ्या प्रमाणावर पाठवला जाईल. किमान एक कोटी मराठी भाषकांनी या महाजागरामध्ये सहभागी व्हावे या दृष्टीने जगभरातील विश्व मराठी परिषदेचे समन्वयक प्रयत्न करत आहेत.

संदीप पाध्ये, संयोजक, बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०२१ शारलेट अमेरिकाजग सध्या एका अनाकलनीय, भीषण आणि भयकंपित अशा परिस्थितीतून जात आहे. जगभरातील मराठी भाषक या प्रसंगी एकत्र असून, ते परस्परांना आधार देत जागृती निर्माण करणार आहेत, अनुभवांची देवाणघेवाण करणार आहेत. सध्याही ते गप्पा मारत आहेत, लेखन करत आहेत, कविता लिहीत आहेत, सर्जनशील निर्मिती करीत आहेत, आपल्या भावनांना वाट करून देत आहेत, मन मोकळे करत आहेत आणि धीराने या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. मुख्य म्हणजे हे सर्व जण सर्वसामान्य मराठी नागरिक आहेत. यात कोणी सेलिब्रिटी अथवा राजकारणी नाही. सामान्य माणसांनी एकत्र येऊन एकमेकांना दिलेला मानसिक आणि भावनिक आधार असे या महाजागराचे स्वरूप आहे.

कोविड-१९ महामारीशी लढताना शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य सुदृढ राखणे आवश्यक आहे. अशा वेळी जगभरातील मराठी भाषकांचे ऐक्य, बंधुभाव आणि संवाद यांचा हा अभूतपूर्व आविष्कार असेल. विशेष म्हणजे या उपक्रमाद्वारे कोविड-१९ काळातील जगभरातील मराठी बांधवांच्या संवादाचे एक महत्त्वपूर्ण असे दस्तावेजीकरणही होईल. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य, जागृती, दस्तावेजीकरण, सर्जनशील कल्पनांचा आविष्कार आणि विश्वसंवाद असे या उपक्रमाचे अपेक्षित फलित आहे, असे प्रतिपादन विश्व मराठी परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले आहे. 

एखाद्या भाषिक समूहाने एकत्र येऊन अशा प्रकारे संवेदनशीलतेचा आणि एकत्वाचा एकाच वेळी महाजागर करायचा आणि सामूहिक मानसिक, भावनिकतेला बळ द्यायचे ही जगातील वेगळीच घटना असेल.

जगभरातील विविध देशांतील महाराष्ट्र मंडळे, सांस्कृतिक मंडळे, मराठी संस्था, मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धन संस्था, मराठी कट्टे आदी या उपक्रमात सहभागी होत आहेत. अमेरिकेतील आर्सी फाउंडेशन यासाठी विशेष साह्य करत आहे. या महाजागरामध्ये सहभागी होण्यासाठी www.vishwamarathiparishad.org या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि ७०६६२ ५१२६२ या परिषदेच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधावा. या महाजागराशी संबंधित व्हिडिओ विश्व मराठी वाणी या यू-ट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध झाला आहे. (व्हिडिओ शेवटी दिला आहे.) 

देश-विदेशातील अधिकाधिक मराठी भाषकांनी या महाजागरामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले आणि अनिल कुलकर्णी यांनी केले आहे. 

उपक्रमाचे नेतृत्व :
विद्या जोशी, अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका
संदीप पाध्ये, संयोजन, बीएमएम अधिवेशन २०२१, शार्लेट, अमेरिका आणि ‘गर्जे मराठी’चे संस्थापक
डॉ. रवीद्र कुलकर्णी, आर्सी फाउंडेशन, न्यूयॉर्क

सहभाग आणि समन्वय :
१) मीनाक्षी पाटील, चित्रकार, कवयित्री, सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती विभाग
२) मंजूषा कुलकर्णी, कवयित्री, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मराठी भाषा संचालक (माजी)
३) सुशील रापतवार, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ, लंडन
४) अजित रानडे, संस्थापक अध्यक्ष, मराठी कट्टा, जर्मनी
५) संदीप दीक्षित, विश्वस्त, बृहन्महाराष्ट्र मंडळ, नॉर्थ अमेरिका
६) प्रशांत बेलवलकर, ऑकलँड मराठी असोसिएशन न्यूझीलंड आणि गर्जे मराठी, संस्थापक सदस्य
७) प्रिया आपटे, संस्थापक, बृहन्महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड
८) रश्मी गोरे, अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, व्हिक्टोरिया, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
९) निरंजन गाडगीळ, विश्वस्त, बृहन्महाराष्ट्र मंडळ, टोकियो, जापान
१०) दीपक वेताळ, माजी अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ शार्लेट, यूएसए
११) भारत सासणे, प्रसिद्ध मराठी लेखक आणि साहित्यिक, पुणे
१२) मोनिका गजेंद्रगडकर, प्रसिद्ध मराठी लेखक, कवयित्री, संपादक- मौज प्रकाशन
१३) गिरीश दिवाकर, अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, युगांडा
१४) राहुल बागडे, अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, शांघाय, चीन
१५) मृणाल गर्दे, सचिव, बृहन्महाराष्ट्र मंडळ, फ्रान्स
१६) भावना शेंड्ये, सचिव, बृहन्महाराष्ट्र मंडळ केनिया (माजी)
१७) नोहा मस्सील, संस्थापक, मायबोली मराठी मासिक, इस्रायल
१८) अनिल कुलकर्णी, संस्थापक संचालक, विश्व मराठी परिषद
१९) राजन लाखे, प्रमुख, साहित्य कट्टा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
२०) मनोज कुलकर्णी, अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, हाँगकाँग
२१) विजय पाटील, संस्थापक, शिवाजी महाराज अमेरिका परिवार, यूएसए
२२) श्रीनाथ सरनोबत, अध्यक्ष, मराठी भाषिक मंडळ, टोरॅन्टो, कॅनडा
२३) अमेय साठे, बृहन्महाराष्ट्र मंडळ, डेन्मार्क
२४) सुधीर जोशी, बृहन्महाराष्ट्र मंडळ न्यूझीलंड आणि संस्थापक सदस्य, गर्जे मराठी
२५) अर्जुन पुतलाजी, अध्यक्ष, मराठी सांस्कृतीक केंद्र, मॉरिशस
२६) सुमित कांबळे, विश्वस्त, बृहन्महाराष्ट्र मंडळ, जकार्ता, इंडोनेशिया
२७) विनायक पाटुकले, प्रसिद्धी आणि मीडिया प्रमुख, विश्व मराठी परिषद
२८) अनिकेत पाटील, प्रमुख व्यवस्थापक, विश्व मराठी परिषद
२९) संतोष अंबिके, अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर
३०) मंजूषा नाईक, अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, दक्षिण फ्लोरिडा, यूएसए
३१) अर्पिता कुलकर्णी, सह-अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, बँकॉक
३२) अक्षय महाशब्दे, सदस्य, बृहन्महाराष्ट्र मंडळ, नेदरलँड्स
३३) चिन्मय सहस्रबुद्धे, सदस्य, बृहन्महाराष्ट्र मंडळ, आयर्लंड
३४) सुरेश वाघमारे, माजी अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, कुवेत
३५) निखिल कुलकर्णी, सॅन जोसे, सिलिकॉन व्हॅली, कॅलिफोर्निया, यूएसए
३६) म. भा. चव्हाण, प्रसिद्ध मराठी कवी, गझलकार आणि साहित्यिक
३७) हिमांशू कुलकर्णी, प्रसिद्ध कवी आणि रूबायाकार (रुबाया)
३८) गजानन खोलगडे, अध्यक्ष, महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ, बहारीन
३९) सुलक्षणा कुलकर्णी, संचालिका, शिकागो मराठी शाळा, यूएसए
४०) शिरीन कुलकर्णी, काउंसेल ऑफ क्रिएटिव्ह एज्युकेशन, फिनलँड
४१) प्रशांत जोशी, अध्यक्ष, मराठी सोसायटी ऑफ ब्रिटिश, कोलंबिया, कॅनडा
४२) प्रचिती तलाठी, समन्वयक, एमिराट्स दुबई लिटररी फेस्टिवल (Literary Festival)
४३) वल्लभ केळकर, संचालक, गोवा मराठी अकॅडमी
४४) विद्या देवधर, अध्यक्ष, मराठी साहित्य परिषद, तेलंगण
४५) कुमुदिनी विचारे, समन्वयक, विश्व मराठी परिषद, कंबोडिया
४६) अरुण पाटील, अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, घाना
४७) संतोष कदम, बृहन्महाराष्ट्र मंडळ, ओमान
४८) धनंजय मोकाशी, विश्वस्त, बृहन्महाराष्ट्र मंडळ, अबूधाबी
४९) सचिन किन्हिकर, माजी अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, कतार
५०) अश्विन चौधरी, समन्वयक, विश्व मराठी परिषद, कॅनडा
५१) सतीश पाटील, बृहन्महाराष्ट्र मंडळ, लुसाका, झांबिया
५२) विवेक वेलणकर, संस्थापक, सजग नागरिक मंच, पुणे
५३) अंजली कुलकर्णी, प्रसिद्ध मराठी कवयित्री आणि साहित्यिक
५४) अॅड. कल्याणी पाठक, वकील आणि कॉपीराइट तज्ञ
५५) अनिल गोरे, मराठी काका, सदस्य, मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र
५६) दिलीप खोपकर, माजी अध्यक्ष, मराठी वाड्मय परिषद, बडोदे
५७) पूर्णिमा हुंडीवाले, माजी संचालक, मध्य प्रदेश मराठी साहित्य अकादमी
५८) गजानन पाटील, अध्यक्ष, कवी केशवसुत स्मारक ट्रस्ट आणि प्रतिनिधी, कोकण मराठी परिषद
५९) किशोर काकडे, माजी अध्यक्ष, मंगळुरू मराठी मंडळ
६०) जितेंद्र रेडेकर, मराठी बुकलव्हर्स क्लब, बेळगाव
६१) नीलिमा बोरवणकर, प्रसिद्ध मराठी लेखिका, पुणे
६२) कल्याणी कुलकर्णी, लेखिका आणि ब्लॉगर, पुणे
६३) मोहन रेडगावकर, प्रसिद्ध मराठी लेखक, इंदोर, मध्य प्रदेश
६४) ओंकार दाभाडकर, संस्थापक, इनमराठी डॉट कॉम
६५) नंदकुमार दिवटे, संचालक, करवीर नगर वाचन मंदिर, कोल्हापूर
६६) रणजित कामत, अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, होस्टन, यूएसए
६७) मकरंद उत्पात, न्यू जर्सी, यूएसए

विश्व मराठी परिषद
प्रमुख मार्गदर्शक : डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
संस्थापक अध्यक्ष : प्रा. क्षितिज पाटुकले
संस्थापक संचालक : अनिल कुलकर्णी




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZORCM
Similar Posts
कोविड-१९ : विश्व मराठी परिषदेतर्फे कथा, कविता लेखन स्पर्धा; रोख बक्षिसे पुणे : करोना या विषाणूमुळे पसरलेल्या कोविड-१९ या अभूतपूर्व महामारीमुळे जगभर हाहाकार माजला आहे. या परिस्थितीशी दोन हात करता करता अनेक हात हे अनुभव कथा-कवितेच्या रूपाने शब्दबद्धही करत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विश्व मराठी परिषदेने जगभरातील मराठी भाषकांसाठी कथा-कविता लेखन स्पर्धा आयोजित केली आहे
झेंडे अटकेपार : भारताबाहेरील मराठी व्यक्तींच्या प्रेरणादायी कर्तृत्वाबद्दलची व्हिडिओ मालिका मराठी भाषक बांधवांच्या भारताबाहेरील नऊ देशांतील देदीप्यमान कर्तृत्वाची अनोखी गाथा दर्शविणारी व्हिडिओ मालिका नुकतीच विश्व मराठी परिषदेने आपल्या विश्व मराठी वाणी या यू-ट्यूब चॅनेलद्वारे प्रदर्शित केली. ही मालिका प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा देईल, त्याच्यासाठी नवनवीन संधीचे दालन त्यातून खुले होईल.. प्रा
वैश्विक मराठी भाषकांचे पहिले ऑनलाइन संमेलन जानेवारीत विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी संमेलन ऑनलाइन पद्धतीने बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या सहयोगाने आणि २५ देशांतील महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. त्या संमेलनाची माहिती देणारा हा लेख...
विश्व मराठी संमेलनानिमित्त सात निःशुल्क लेखन (ऑनलाइन) कार्यशाळा विश्व मराठी परिषदेने २८ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीमध्ये विश्व मराठी ऑनलाइन संमेलन आयोजित केले आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपयुक्त विषयांवर सात ऑनलाइन लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language